डॉ. संजीवनी केळकर - लेख सूची

पुस्तक परिचय- वेताळाच्या आरोग्यकथा

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेले हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक. “बंडखोरी करणाऱ्या व नवनिर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या व उपस्थित करण्याच्या प्रवृत्तीस’ ही अर्पण पत्रिकाही कुतूहल वाढवणारी आहे. औषधशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवून मुंबईला एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात २० वर्षे प्राध्यापिकी केलेल्या या लेखक महोदयांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडली. स्त्री भ्रूणहत्येचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, सोबतच …

अभ्यागत संपादकाचे संपादकीय : आपली आरोग्यव्यवस्था दिशा व प्रश्न

आजचा सुधारक हे आगरकरांचा वारसा सांगणारे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे. त्यात सर्वसाधारणपणे आरोग्याखेरीजचे अन्य सामाजिक विषय आजपर्यंत आलेले आहेत. आज आरोग्याचे नवनवे सामाजिक प्रश्न व आरोग्यसेवादेखील समाजाच्या सर्वच अंगांना भिडते आहे. त्याचे सध्याचे स्वरूप काय आहे, त्याचे भविष्य काय, त्याचा समाजावर आता व पुढे काय परिणाम होणार आहे या विषयांची चर्चा आवश्यक वाटल्याने ह्या अंकाचे …

स्त्री-आरोग्य

“In nature there are neither rewards nor punishments, there are consequences.” Robert Ingersoll (निसर्गात कुणाला बक्षिसही नाही किंवा शिक्षाही नाही. निसर्गात फक्त परिणाम असतात. रॉबर्ट इंगरसॉल) बाह्य रुग्ण विभागात (ओ.पी.डी.त) एक बाई रुग्ण खूप आरडाओरडा करीत होती म्हणून मी पहायला गेले. चौथ्यांदा गर्भ राहिला होता, ५-६ महिने झाले होते. पहिल्या तीनही मुली होत्या. तिला तपासून …

(पुरुषकार्याची चढती शिडी)

“पुरुष हा शेवटी पुरुष आहे आणि स्त्री ही स्त्रीच आहे. मग ते कितीही शिकोत, काहीही करोत.” “स्त्रिय चरित्रं पुरुषस्य भाग्यं, देवो न जानाति कुतो मनुष्यः””लिंगभेद सोडला तर बाकी सर्व बाबतीत स्त्रिया का नाही पुरुषांची बरोबरी करू शकणार?””स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते, आणि पुरुष? पुरुष अनंतकाळचा प्रियकर आणि क्षणाचाच पिता असतो?” “Men are …

“AIDS”! : एडसची भयावहता

आज आपण २००१ च्या—-नव्या वर्षाच्या, नव्या शतकाच्या—-नव्या सहस्रकाच्या जानेवारी महिन्यात पोचले आहोत. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यात Information & Technology Industry च्या बरोबर Genetic Engineering पासून क्लोनिंग आणि मानवी Genome पर्यंत पोचलो आहोत. अनेक रोगांचा नायनाट करण्याचे सामर्थ्यही आपल्यात आज आहे. आपण बऱ्याच रोगांपासून बचाव करू शकतो. मनुष्याच्या आयुष्याची लांबी वाढत जाते आहे. लांबी …

संवेदनशैथिल्य आणि सामाजिक आरोग्य

मनुष्यजातीच्या वृत्तीतला थंडपणा, जाणिवांचा बोथटपणा वा कोडगेपणा याला मी संवदेनशैथिल्य असे म्हणते. संवदेनशील असणे, संवेदनांना सचेतन करणे किंवा उत्तेजना देणे (stimulation) हे माणसाच्या विकासासाठी व वाढीसाठी अत्यावश्यक असते. अशी उत्तेजना (Stimulation) जर वातावरणामधून मिळाली नाही तर माणसात मानसिक व शारीरिक गोंधळ निर्माण होतो. त्यातून विकृती निर्माण होऊ शकते. या उत्तेजनाही विविध प्रकारच्या असल्या तरच माणसाचे …